पीटीआय, चंडीगड

जम्मू-काश्मीर ते पंजाबदरम्यान एक मालगाडी रविवारी चक्क चालकाशिवाय तब्बल ७० कि.मी धावली! या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथून पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका गावापर्यंत तब्बल ७० कि.मी. हून अधिक अंतर ही मालगाडी विनाचालक धावली. सकाळी ७.२५ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मालगाडीला दगडांनी भरलेल्या ५३ बोगी जोडलेल्या होत्या. रेल्वे पोलिसांनी माहिती दिली की या ट्रेनविषयी सूचना मिळाल्यानंतर जालंधर-पठाणकोट भागातील सर्व रेल्वे-रस्ते क्रॉसिंग बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 km driverless run of freight train punjab amy
First published on: 26-02-2024 at 05:35 IST