नवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले | 7th Pay Commission Centre Approves 4 percent DA Hike For Govt Employees scsg 91 | Loksatta

नवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले

केंद्र सरकारमधील ५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर ६२ लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही याचा लाभ होणार.

नवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो सौजन्य नरेंद्र मोदी डॉट कॉमवरुन साभार)

7th Pay Commission Centre Approves 4% DA Hike For Govt Employees: महागाई भत्त्यासंदर्भातील निर्णयाची वाट पाहणाऱ्या लाखो सरकारी कर्चमाऱ्यांची प्रतिक्षा आज संपली. नवरात्रोत्सवादरम्यान सामान्यपणे महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र हा भत्ता मिळण्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांवी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ३४ ऐवजी ३८ टक्के भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारमधील ५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर ६२ लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्त्या हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे जो मूळ पगाराच्या विशिष्ट टक्केवारी म्हणून मोजला जातो जो नंतर मूळ पगारात जोडला जातो.

नक्की वाचा >> Railway Bonus: दसऱ्याआधीच रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार; ११ लाख कर्मचारी ठरणार ‘लाभार्थी’

केंद्रातील मोदी सरकारने दसऱ्याच्या आधीच हा निर्णय घेतल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा याचा मोठा फायदा मिळणार आहे. हा भत्ता चार टक्के वाढल्याने पगारानुसार कोणाला किती फायदा होणार आहेत पाहूयात…

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये २५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर ९ हजार ५०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम ८ हजार ५०० रुपये असेल. याचाच थोडक्यात अर्थ असा की पगारामध्ये एक हजार रुपयांची वाढ होईल.

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये ३५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर १३ हजार ३०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम ११ हजार ९०० रुपये असेल. याचाच अर्थ असा की पगारामध्ये एक हजार ४०० रुपयांची वाढ होईल.

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये ४५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर १७ हजार १०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम १५ हजार ३०० रुपये असेल. म्हणजेच पगारामध्ये एक हजार ८०० रुपयांची वाढ होईल.

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये ५५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर २० हजार ९०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम १८ हजार ७०० रुपये असेल. याचा अर्थ असा की पगारात दोन हजार २०० रुपयांची वाढ होणार.

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये ६५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर २४ हजार ७०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम २२ हजार १०० रुपये असेल. याचाच थोडक्यात अर्थ असा की पगारामध्ये दोन हजार ६०० रुपयांनी वाढ होईल.

सरकारी कर्मचार्‍यांना साधारणपणे या वर्षाच्या उत्तरार्धात डीएमधील वाढ (सातव्या वेतन आयोगावर आधारित) घोषणेप्रमाणे प्राप्त होते. सामान्यपणे ही वेतनवाढ नवरात्रोत्सवाच्या आसपास मिळते. मार्चच्या सुरुवातीला, मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (डीआर) पूर्वी १ जानेवारी २०२२ च्या ३१ टक्क्यांवरून तीन टक्क्यांनी वाढवून ३४ टक्के केला होता. आता त्यात पुन्हा चार टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याआधीच दिवाळी आली असं म्हणता येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
टोमणे मारणाऱ्या पतीचा कुऱ्हाडीने वार करुन खून, गुप्तांगही कापलं; महिलेने केले क्रूरकर्म पाहून पोलीसही चक्रावले

संबंधित बातम्या

आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
भारतातील प्रसिद्ध रुग्णालय AIIMSचा सर्व्हर हॅक; हॅकर्सनी मागितली २०० कोटींची खंडणी
विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटल्याचा VIDEO व्हायरल; प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे आता तिसरे वेळापत्रक; बदली प्रक्रिया मेमध्ये पूर्ण करण्याची शिक्षकांची मागणी
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
भारतातील प्रसिद्ध रुग्णालय AIIMSचा सर्व्हर हॅक; हॅकर्सनी मागितली २०० कोटींची खंडणी
करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’