अमेरिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही अज्ञातांनी मॅनहट्टन येथील युनियन स्क्वेअरजवळ असणाऱ्या या ८ फूट उंच पुतळ्याची तोडफोड केली आहे.

अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दुतावास हा घटनेचा अत्यंत तीव्र शब्दांमध्ये निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी दुतावासाने स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

महात्मा गांधींच्या ११७ व्या जन्मतिथीला २ ऑक्टोबर १९८६ रोजी हा ८ फूट उंच पुतळा गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनकडून भेट म्हणून देण्यात आला होता. योगायोगाने, पुतळा २००१ मध्ये काढून टाकण्यात आला, २००२ मध्ये एका लँडस्केप गार्डन परिसरात तो पुन्हा उभारण्यात आला.

गेल्या महिन्यातदेखील काही समाजकंठकांनी कॅलिफोर्नियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली होती. यानंतर भारत सरकारकडून भेट म्हणून देण्यात आलेला पुतळा तिथे चार वर्षांपूर्वी पुन्हा बसवण्यात आला.