India Pakistan Attack : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून आज (गुरूवार) पाकिस्तानकडून डागण्यात आलेली ८ क्षेपणास्त्रे एअर डिफेन्स युनिटने रोखली आहेत अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे जम्मूच्या सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया शहर या दिशेने डागण्यात आली होती. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
“जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळून आज जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर पाकिस्तानी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यत आला. कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक क्षमतांचा वापर करत स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर वापरून हा धोका तात्काळ निष्क्रिय करण्यात आला. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मटेरियल नुकसान झाले नाही. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहे,” अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Military stations at Jammu, Pathankot & Udhampur were targeted by Pakistani-origin #drones and missiles along the International Border in J&K today.
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 8, 2025
The threats were swiftly neutralised using kinetic and non-kinetic capabilities in line with established Standard Operating…
स्थानिक नागरिकांनी आकाशात क्षेपणास्त्रे पहिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापासून जम्मूमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत ठेवण्यात आला. यावेळी स्थानिकांनी देखील अनेक ठिकाणी सायरनचा आवाज ऐकल्याचे सांगितले. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू विमातळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जम्मू पोलिसांनी या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच पोलिसांकडून ब्लॅकआऊटच्या कालावधीत सर्व प्रकारचे दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना घरामध्ये सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याबरोबरच ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या हल्ल्यासह पाकिस्तानातून जम्मूच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात आर्टिलरीने हल्ला करण्यात आला. श्रीनगरमध्ये विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता तसेच संरक्षण यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रनगर येथीही ब्लॅकआउट झाले.
अनेक ठिकाणी वीज खंडीत
पंजाब आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्येही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पंजाबमध्ये अमृतसर, जालंधर , गुरुदासपूर, तरनतारन, होशियारपूर, पठाणकोट, फिरोजपूर, फाजिल्का आणि चंदीगडमध्ये वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. याबरोबरच हरियाणातील मोहाली आणि पंचकुला येथेही वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले.
राजस्थानमध्ये देखील जैसलमेर आणि बिकानेर या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये आकाशात ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे दिसल्याचे वृत्त दिले, जे एअर डिफेन्स सिस्टमने पाडले.