मॅकडोनल्डमध्ये उंदाराने एका आठ वर्षाच्या मुलाच्या पायाचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हैदराबादच्या कोमपल्ली भागात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “अजून हुंडा पाहिजे” म्हणत नवरी मांडव सोडून हॉटेलवर गेली, मुहूर्ताच्या एक तास आधी वरपक्षाला…

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

मिळालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सायंकाळी हैदराबादच्या कोमपल्ली भागात एक आठ वर्षांचा मुलगा आपल्या आई-वडीलांबरोबर नाश्ता करण्यासाठी मॅकडोनल्डमध्ये गेला होता. नाश्ता करतानाच एका उंदराने मुलाच्या अंगावर उडी घेतली. तसेच त्यांच्या पायाचा चावा घेतला. मुलाच्या वडीलांनी तत्काळ मुलाला उंदरापासून दूर केले. तसेच मॅकडोनाल्डच्या कर्मचाऱ्यांकडे याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा – शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली कियांग बनले चीनचे नवे पंतप्रधान, १० वर्षांनंतर केकियांग पायउतार

या घटनेनंतर मुलाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तसेच मुलाच्या वडिलांनी मॅकडोनल्डविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली नसून यापूर्वी अहमदाबादमधील मॅकडोनाल्डच्या एका आऊटलेटमध्ये कोल्डड्रींकमध्ये सरडा आढळून आला होता. त्यानंतर अहमदाबाद महापालिकेने हे आऊटलेट बंद केले होते.

हेही वाचा – Supreme Court Hearing: समलिंगी जोडप्याचं मूलही समलिंगीच…”, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; सरकारी वकिलांना दिली समज!

दरम्यान, ”हैदराबादमध्ये घडलेली घटना गंभीर असल्याची आम्हाला जाणीव आहे. ही घटना ग्राहकांप्रमाणेच आमच्या कर्मचाऱ्यासाठीही अनपेक्षित होती. या घटनेनंतर आमच्या कर्मचाऱ्यांकडून लगेच कार्यवाही करण्यात आली”, असं स्पष्टीकरण मॅकडोनाल्डकडून देण्यात आलं आहे. तसेच ”आम्ही भारतातील मॅकडोनल्ड्सच्या सर्व आऊटलेटमध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक आऊटलेटमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोलिंग केले जाते. तसेच आम्ही स्वच्छतेबाबत आवश्यक ती सर्व काळीज घेत असल्याचं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत”, असंही मॅकडोनल्डने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.