केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये पर्यटकांच्या एका बसचा भीषण अपघात घडला आहे. केएसआरटीसीची बस पर्यटक बसला धडकल्याने घडलेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३८ जण जखमी झाली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पर्यटक बस एर्नाकुलम जिल्ह्यातील बसलियोस विद्यानिकेतनच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटी येथे जात होती.

केरळचे राज्यमंत्री एमबी राजेश यांनी माहितीन दिली की, पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे केएसआरटीसीची बसच्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३८ जण जखमी झाले. पर्यटक बस ही बसलियोस बिद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन एर्नाकुलम येथून उटी येथे जात होती, तर त्याचवेळी केएसआरटीसीची बस कोईम्बतूरच्या दिशेने निघाली होती. या दरम्यान हा भीषण अपघात घडला.

मृतांमध्ये केअसआरटीसी बसमधील पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. तर एकूण ३८ जण रुग्णालयात आहेत. यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत.