अमेरिकेचं ९०० अब्ज डॉलर्सचं करोना पॅकेज; बेरोजगारांना दर आठवड्याला २२ हजार तर गरजूंना मिळणार ४४ हजार रुपये

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेले समाजातील घटक आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेजची घोषणा

जगभरातील अनेक देशांना करोनाचा फटका बसला असला तरी जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील अर्थव्यवस्था कोलमडल्याचं चित्र मागील काही महिन्यांमध्ये पहायला मिळालं. मात्र आता याच अर्थव्यवस्थांना उभारी देण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये आर्थिक मदतीची घोषणा केली जात आहे. अमेरिकेतील संसदेनेही ६६३ लाख कोटींचे म्हणजेच ९०० बिलियन डॉलर्सच्या करोना मदतनिधीची घोषणा केली आहे. या नवीन आर्थिक मदतीमुळे बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर (२२ हजार रुपये) आणि गरजूंना ६०० डॉलर (४४ हजार रुपये) मदत दिली जाणार आहे. सर्वाधिक फटका बसलेले उद्योग, शाळा आणि आरोग्य सेवांनाही या आर्थिक पॅकेजमधून मदत केली जाणार आहे.

नक्की पाहा >> ३० हजार ६६० कोटींचे दान… चार महिन्यात ‘तिने’ ३८४ संस्थांना केली मदत

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन हे २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. यापूर्वीच त्यांनी सत्ता हाती घेण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत. एका महिन्यात आम्ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करु. याच कामासाठी बायडेन आता स्वत:ची टीम वाढवत आहेत. बायडेन यांनी ट्विटवरुन, “एका महिन्यात आम्ही सारं काही ठीक करण्यास सुरुवात करणार आहोत,” असं म्हटलं आहे. बायडेन यांच्या टीमनेही सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्ही जल आणि वायू प्रदुषणासंदर्भात जगातिक स्तरावर नेतृत्व करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. बायडेन यांनी करोना आर्थिक पॅकेज अमेरिकन नागरिकांना फायद्याचे ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकन संसदेने रविवारी ९०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात एकमत असल्याचं सांगितलं. या निधीचा वापर करोना काळामध्ये सर्वाधिक फटका बसलेले व्यापारी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी तसेच करोनाच्या लसीकरणासाठी केला जाणार आहेत. मागील बऱ्याच काळापासून या आर्थिक मदतीसंदर्भात चर्चा सुरु होती. अमेरिकन काँग्रेसनेही या आर्थिक मदतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. करोनामध्ये सर्वात वाईट परिस्थिती झालेल्या समाजातील खालच्या थरातील व्यक्तींना मदत करणे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी निधी जाहीर करण्यासाठी बायडेन यांनी सहमती यापूर्वीच दर्शवली होती.

अमेरिकेतील या आर्थिक पॅकेजमधून बेरोजगार, गरजूंना मदत केली जाणार आहे. या सर्व पात्र लोकांना आर्थिक भत्ते दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या निधीमधील काही भाग हा करोना लसीकरणासाठी वापरला जणार आहे. लसीकरण कशापद्धतीने करण्यात यावे यासंदर्भातील नियोजनापासून लस सर्व ठिकाणी पोहचवण्यासाठी यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कामांसाठी या निधीतील ठराविक भाग वापरला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 900 billion dollar covid relief deal in us scsg