इम्फाल विमानतळावर तैनात सीआयएसएफच्या जवानांसमोर एक अजब प्रकार घडला आहे. दिल्लीला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या शरीराच्या पोकळीत एक असामान्य गोष्ट आढळून आली आहे. पुढे या प्रवाशाची शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याच्या गुप्तांगात चक्क ९०० ग्रॅमहून अधिक सोन्याची पेस्ट सापडली आहे. सोमवारी (२७ सप्टेंबर) दुपारी १ च्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रवासी मूळचा केरळचा रहिवासी आहे. त्याच्या शरीरातील पोकळीत धातू आढळल्याचं उपनिरीक्षक बी डिल्ली यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित प्रवासी इम्फालहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणार होता. मात्र, सीआयएसएफ जवानांच्या प्रश्नांना हा प्रवासी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर, त्याला वैद्यकीय तपासणी कक्षात नेण्यात आलं. जिथे त्याच्या खालच्या शरीराचा एक्स-रे काढण्यात आला ज्यात त्याच्या शरीराच्या पोकळीत काही प्रमाणात धातू असल्याचं आढळून आलं. पुढे अखेर या प्रवाशाने कबूल केलं की, तो सोनं (सोन्याची पेस्ट) घेऊन जात होता. त्याच्या शरीरातील पोकळीत धातू आढळल्याचं उपनिरीक्षक बी डिल्ली यांनी सांगितलं.

माहितीनुसार, यावेळी सोन्याच्या पेस्टची सुमारे ९०९.६८ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ४२ लाख रुपयांची चार पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जप्त केलेल्या या सोन्यासह प्रवाशाला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 900 grams of gold hidden in body passenger arrested from airport gst
First published on: 29-09-2021 at 19:19 IST