आईने आपल्या मुलांना चांगलं वळण लावणं, संस्कार करणं, समाजासाठी आदर्श निर्माण करणं अपेक्षित असतं. त्यादृष्टीने अनेक पालक प्रयत्नही करत असतात. आई-वडिलांच्या संस्कारातूनच मुलं घडत असतात. परंतु, काहीठिकाणी आईच्या नात्याला काळिमा फासला जाईल, असे प्रकार समोर येतात. त्यातील एक प्रकार आसामच्या सिलचरमधून समोर आला आहे. या घटनेत आईने आपल्या अवघ्या २० महिन्यांच्या चिमुकल्याला सिगारेट ओढण्यास आणि दारू पाजण्यास भाग पाडल्याचे आढळून आले आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. स्थानिक चाइल्ड हेल्पलाईन सेलला त्या महिलेबद्दल तक्रार मिळाली. त्यानसुार, पोलिसांनी तत्काळ महिलेच्या घरी जाऊन आई आणि मुलालाही ताब्यात घेतले. माध्यमांना दिलेल्या निवेदनात, चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरी येथे एका आईने बाळाला धुम्रपान आणि दारू पिऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आईला ताब्यात घेतले आणि मुलाला वाचवले.

Narendra Modi Documentry
Spies, Secrets and Threats: लोकसभा निवडणुकीचं वार्तांकन करण्यास मज्जाव केलेल्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराकडून पंतप्रधान मोदींवर माहितीपट!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”
flesh eating bacteria in japan
जपानमध्ये मांस खाणार्‍या जिवाणूचा उद्रेक, ४८ तासांत माणसाचा मृत्यू; हे जीवाणू जगभरात थैमान घालणार?
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Rahul gandhi
राहुल गांधींचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? ‘या’ तीन तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Rahul Gandhi Priyanka Gandhi
राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडला, रायबरेलीतून खासदारकी कायम; प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार

हेही वाचा >> केवळ २३ वर्षांची ‘आर्मिश असिजा’ बनली हवाई दलातील सर्वात तरुण महिला IAF अधिकारी! पाहा

आईची होणार चौकशी

सध्या आई आणि मूल हे बालकल्याण समिती (CWC) च्या ताब्यात आहेत आणि सखोल तपास केल्यानंतर, दृष्य पुरावे तपासल्यानंतर आणि आईची चौकशी केल्यानंतर, योग्य ती पावले उचलली जातील. या बातमीवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत महिलेवर योग्य कारवाईची मागणी केली असून काहींनी मूल दत्तक द्यावं असंही म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडिओत आईच्या एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात चिमुकलं बाळ

दरम्यान, असाच आणखी एक प्रकार समोर आला. या घटनेत महिलेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला मुलाला कडेवर घेऊन रिल बनवत आहेत. त्यावेळी तिच्या एका हातात सिगारेटही आहे. अर्धवट जळालेली सिगरेट हातात घेऊन तिने मुलाला कडेवर घेतलं आहे आणि धूर सोडत एका गाण्याच्या बोलावर ती मायमिंग करताना दिसतेय.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या महिलेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला असून या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.