आसाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज(गुरुवार) येथील धुबरी जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदी पात्रात जवळपास ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. यामुळे अनेकजण बुडाले त्यापैकी सहा ते सातजण बेपत्ता अद्याप बेपत्ता आहेत, मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अशी माहिती धुबरीचे उपायुक्त एम पी अनबामुथन यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत धुबरी विभागीय अधिकारी संजू दासही बेपत्ता आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने नदीत बचावकार्य सुरू केले आहे.

ज्यांना पोहता येत होते त्यांचा जीव वाचण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या पथकांना शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.