scorecardresearch

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक? सत्र न्यायालयाने जारी केला अजामीनपात्र वॉरंट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात इस्लामाबाद कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे

A district and sessions court in Islamabad issued non-bailable arrest warrants for PTI chairman Imran Khan
काय म्हटलं आहे कोर्टाने वाचा सविस्तर फोटो सौजन्य- ANI

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंंट जारी करण्यात आला आहे. इस्लामाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि PTI चे अध्यक्ष इम्रान खान यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एका महिलेसह, पोलीस अधिकारी, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांना धमकी दिल्याप्रकरणी इस्लामाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने हे वृत्त दिलं आहे. या वृत्तामुळे आता इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे असंही बोललं जातं आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना पाकिस्तानमध्ये निवडणुका होण्याआधी खटल्यांचा सामना करावा लागतो आहे. तीन दिवसांपूर्वीच बलुचिस्तान येथील न्यायालयाने इम्रान खान यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मात्र शुक्रवारी त्यांना मागे घेतला. इम्रान कान यांनी पाकिस्तानमधल्ये विविध राष्ट्रीय संस्थांच्या विरोधात तिरस्कार पसरवणारी भाषणं केल्या प्रकरणी हा वॉरंट जारी करण्यात आला होता. मात्र दोन दिवसांनी हा वॉरंट रद्द करण्यात आला. अशात आता इस्लामाबाद सत्र न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:58 IST