भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे निवृत्त कर्मचारी असलेल्या नागेश इश्वर राव यांना पोलिसांनी पत्नीच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे. बंगळुरु या ठिकाणी ही घटना घडली. नागेश राव यांच्या घरात १८ फेब्रुवारीला त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला होता. नागेश राव हे इस्रोचे निवृत्त कर्मचारी होते. बंगळुरु या ठिकाणी असलेल्या वर्चुओसो अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये नागेश आणि त्यांची पत्नी संध्या राहात होते.

१८ फेब्रुवारीला काय घडलं?

१८ फेब्रवारी म्हणजेच आज सकाळी नागेश राव यांच्या पत्नीचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी नागेश राव यांना अटक केली. त्यांनी पळून जाण्याचा प्रय़त्न केला नाही. पोलिसांनी नागेश राव यांना अटक केली आणि त्यांनी चौकशीच्या दरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला. आपल्यानंतर आपल्या पत्नीचं काय होईल या काळजीतून त्यांनी तिला संपवल्याचं नागेश राव यांनी पोलिसांना सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

नागेश राव यांच्यावर डिप्रेशनचे उपचार सुरु होते. कारण त्यांना मानसिक आजार जडला होता आणि त्यामुळेच ते त्यांच्या पत्नीच्या भवितव्याची चिंता करत होते. आपल्यानंतर आपल्या पत्नीचं काय होईल ही चिंता त्यांना सतावत होती. त्यातूनच त्यांनी पत्नी संध्याची हत्या केली. प्रचंड नैराश्यात गेल्याने नागेश राव यांनी हा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त सैदुलू अदावथ यांनी माध्यमांना ही माहिती दिली. इस्रोचे माजी कर्माचारी नागेश राव यांनी त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्यांनी तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. पोलीस जेव्हा पोहचले तेव्हा नागेश राव घरातच होते. त्यांनी पळून जाण्याचा किंवा स्वतःचा बचाव करण्याचा काहीही प्रय़त्न केला नाही. त्यांना जे नैराश्य आलं होतं त्यातून त्यांनी हे कृत्य केलं आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.