scorecardresearch

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग!

तामिळनाडूमध्ये आज सकाळी घडली घटना; जाणून घ्या नेमकं काय होतं कारण?

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग!
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱे एक हेलिकॉप्टरला आपत्कालीनरित्या जमिनीवर उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्याशिवाय अन्या चार जण होते. आज सकाळी तामिळानाडूमधील इरोड येथील सत्यमंगलम येथील हवामान खराब होते, त्यामुळे या हेलिकॉप्टरची ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरमधील श्री श्री रविशंकर यांच्यासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत. लँडिंगच्या ५० मिनिटानंतर हवामान ठीक झाल्यावर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 13:12 IST

संबंधित बातम्या