scorecardresearch

CAA: दिल्लीतील जामिया परिसरात गोळीबार करणारा तरुण ताब्यात

हा तरुण कोण आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही

CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलना दरम्यान एका अज्ञात तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तर गोळीबार करणाऱ्या अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाचं नाव गोपाल आहे असं समजतं आहे. या तरुणाने जामिया परिसरात जाण्यापूर्वी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर हा तरुण या भागात गेला आणि त्याने गोळीबार सुरु केला.

दिल्लीत सुधारित नागरित्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात एक अज्ञात तरुणाने गोळीबार केला अशी माहिती समोर आली होती. आता या तरुणाचे नाव गोपाल असल्याचे आणि त्याने गोळीबार करण्याआधी फेसबुक पोस्ट केल्याचे समोर आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण गोळीबार करत असताना “तुम्हाला आझादी हवी असेल तर मी देतो” या असे नारे देत होता. CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा तरुण गोळीबार करु लागला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A man brandishes gun in jamia area of delhi culprit has been detained by police scj