scorecardresearch

धक्कादायक! सेक्ससाठी नकार देणाऱ्या शेजारी महिलेची गळा कापून हत्या

१ जुलै रोजी पोलिसांना २२ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडली असल्याची माहिती मिळाली होती

Delhi Crime
१ जुलै रोजी पोलिसांना २२ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडली असल्याची माहिती मिळाली होती (प्रातिनिधिक फोटो)

सेक्ससाठी नकार दिला म्हणून २५ वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. दिल्लीमधील गांधीनगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपीची ओळख पटली असून मान सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

१ जुलै रोजी पोलिसांना रघुबरापुरामध्ये २२ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पायऱ्यांवर पडली असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मृतदेह जीटीबी रुग्णालयात नेण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मान सिंग जवळचा एका रेडिमेड गारमेंटच्या कारखान्यात काम करत होता. घटना घडली त्यादिवशी त्याने घरात काम करण्यासाठी कारखान्यातून कैची आणली होती. सर्व कामगार निघून गेल्यानंतर त्याने मद्यपान केलं होतं. पीडित तरुणी इमारतीच्या गच्चीवर कपडे सुकत घालण्यासाठी आली असता त्याने तिला अडवलं आणि शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार देत पतीकडे तक्रार करण्याची धमकी देताच आरोपीने तिची गळा कापून हत्या केली.

पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी जीटीबी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असता धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. यानंतर आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला”. पोलिसांनी आरोपी मान सिंगला बेड्या ठोकल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A man slit neighbour woman throat after she refused sexual favors in delhi sgy