VIDEO: 'शतपावली'साठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पाठलाग, भररस्त्यात २० वेळाने चाकूने भोसकलं, लोक फक्त पाहत राहिले | A man stabbed 20 times in Delhi caught in CCTV sgy 87 | Loksatta

VIDEO: ‘शतपावली’साठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पाठलाग, भररस्त्यात २० वेळा चाकूने भोसकलं, लोक फक्त पाहत राहिले

दिल्लीमध्ये २१ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना

VIDEO: ‘शतपावली’साठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पाठलाग, भररस्त्यात २० वेळा चाकूने भोसकलं, लोक फक्त पाहत राहिले
दिल्लीमध्ये २१ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना

दिल्लीमध्ये २१ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात तरुणाला तब्बल २० वेळा चाकूने भोसकण्यात आलं. या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणावर हल्ला होत असताना लोक फक्त पाहत उभे राहिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. घटनेनंतप परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मनिष असून तो सुंदर नगरी परिसरात वास्तव्यास होता. आरोपींचीही ओळख पटली असून आलम, बिलाल आणि फैझान अशी त्यांची नावं आहेत. तिघांविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत हे जातीय प्रकरण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसंच लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत आरोपी पीडित तरुणाची कॉलर पकडून त्याच्यावर वार करत असल्याचं दिसत आहे. तरुण पाळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण आरोपी त्याला पकडतात. आरोपी तरुणाला रस्त्यावर फरफटत नेताना आणि सतत वार करताना दिसत आहेत. यावेळी दोन लोक रस्त्यावर उभे होते, पण त्यातील कोणीही मदतीसाठी पुढे सरसावलं नाही.

“आम्हाला स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. आमचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तपासादरम्यान तीन आरोपींची ओळख पटली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे”.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
राजस्थान काँग्रेसमध्ये एकजूट, पक्षांतर्गत वाद निव्वळ कथा ;पायलट
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election Phase 2 : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान; पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये बजावणार मतदानाचा अधिकार
लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
“‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा