मैत्रिणीला खुश करण्यासाठी मालकाचे ४४ लाख पळवून झाला होता फरार आणि…

पैशांसोबत त्या व्यक्तीनं पालकाची गाडीही पळवली

संग्रहित छायाचित्र

अनेकदा आपण चित्रपटांमध्ये हीरो आपल्या गर्लफ्रेन्डला खुश करण्यासाठी अनेक गोष्टी करत असताना पाहिलं असेल. परंतु खऱ्या आयुष्यातही अशी एक घटना घडली आहे. आपल्या गर्लफेन्डला खुश करण्यासाठी एका व्यक्तीनं आपल्या मालकाचेच पैसे लूटले.

दिल्लीतील बवाना परिसरात हा प्रकार घडला. आपल्या गर्लफेन्डला खुश करण्यासाठी एका व्यक्तीनं आपल्या मालकाचेच ४४ लाख रूपये लूटले आणि फरार झाला. इतकंच नाही तर पैशांसोबत त्यानं मालकाची बलेरो गाडीही चोरली. परंतु पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीनं त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पैसे आणि गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे.

आणखी वाचा- सावत्र मुलाने आईवर केला बलात्कार

तक्रारदाराची दिल्लीतील बवाना परिसरात एक कंपनी आहे. अमित नावाची व्यक्ती त्याच कंपनीत कामाला होती. १७ डिसेंबर रोजी कंपनीच्या मालकानं अमितकडे ४४ लाख रूपये बँकेत जमा करण्यासाठी दिले. परंतु ते पैसे बँकेत जमा करण्याऐवजी ते घेऊन तो फरार झाला. यासोबतच त्यानं आपल्य़ा मालकाची बलेरो गाडीही नेली. यानंतर कंपनीच्या मालकानं पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अमित नावाच्या व्यक्तीला अटक केली. तसंच त्याच्याकडून ४४ लाख रूपयांमधील ३६ लाख रूपये आणि बलेरो गाडी जप्त करण्यात आली. आपल्याकडे पैशाची तंगी होती. पण आपल्याला गर्लफ्रेन्डसोबत पुढे चांगलं आयुष्य जगायचं होतं, असं आरोपीनं पोलिसांन सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A man working in delhi factory arrested after looted 44 lakhs of his master to impress girlfriend jud

ताज्या बातम्या