देशभरात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. आता दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतील कार्यालयाचा तिसरा मजला पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तिसरा मजला सील करण्यात आला असून सध्या तिथे निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबवली जात आहे.

यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, दिल्लीत करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज(दि.1) दिल्लीच्या सीमा सात दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना आणि व्यक्तींना बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची परवानगी देण्यात आली आहे.