Karnataka : एखादा व्यक्ती जिवंत असतानाही कागदोपत्री मृत दाखवल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. कधी-कधी सरकारी कागदपत्रांमध्ये गोंधळ झाल्याच्या घटना पाहायला मिळतात. आता अशीच एक धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. एका संगणक ऑपरेटरच्या चुकीमुळे एका जिवंत व्यक्तीला अधिकृतरित्या मृत असल्याचं दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे गोंधळ उडाला आहे.

आता झालं असं की, बेळगावचे उपायुक्त मोहम्मद रोशन यांच्याकडे सोमवारी सावगाव येथून एक व्यक्ती त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रासह आला होता. गणपती काकतकर असं त्या व्यक्तीचं नाव होतं. आता उपायुक्त मोहम्मद रोशन यांच्या कार्यालयाला त्या व्यक्तीने भेट देण्यामागचं कारण होतं की, एका डेटा एन्ट्री संगणक ऑपरेटरने केलेली चूक दुरुस्त करायची होती. कारण त्यामध्ये जिवंत व्यक्तीला अधिकृतरित्या मृत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. यासाठी थेट आयएएस अधिकाऱ्याची मदत त्या व्यक्तीला घ्यावी लागली. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

Brutal accident video kid came under car accident viral video on social media
असा अपघात कधीच पाहिला नसेल! चिमुकल्याचं एक पाऊल अन् थेट मृत्यूच्या दारात; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
producer k p chowdary dies by suicide in goa
प्रसिद्ध निर्मात्याने ४४ व्या वर्षी गोव्यात केली आत्महत्या, ६५० कोटी कमावणाऱ्या सुपरहिट सिनेमाची केलेली निर्मिती, नेमकं काय घडलं?
Congress MLA Shakeel Ahmed Khan Son Dies By Suicide
काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या, शासकीय बंगल्यात आढळला मृतदेह
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू

हेही वाचा : Elon Musk : “तुमच्या पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो”, TED Talks च्या प्रमुखांनी एलॉन मस्क यांना फटकारले

दरम्यान, गणपती काकतकर यांच्या म्हणण्यांनुसार २ फेब्रुवारी १९७६ रोजी त्यांचे आजोबा मसानु काकतकर मरण पावले. त्यानंतर त्यांनी सोडलेल्या सहा एकर आणि २३ गुंठे जमिनीवर आपला वाटा मिळावा यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आजोबाच्या मृत्यूनंतरही ही जमीन हस्तांतरित झाली नाही. कालांतराने मसानुचे तीन मुलगे मरण पावले आणि मालमत्ता गणपतीसह त्याच्या आठ नातवंडांकडे गेली. दोन वर्षांपूर्वी नातवाला आपल्या नावावर जमीन नोंदवायची होती. परंतु तहसीलदार कार्यालयाने आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. त्यानंतर त्यांनी बेलगाच्या स्थानिक न्यायालयात धाव घेतली त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर हिंडलगा येथील महसूल निरीक्षक कार्यालयातील एका संगणक ऑपरेटरने एक चूक केली, जी गणपती काकतकर यांच्या काही महिन्यांनंतर लक्षात आली. जेव्हा त्याचे नाव कुटुंबाच्या शिधापत्रिकेतून काढून टाकण्यात आले. कारण गणपतीला अधिकृतरित्या मृत दाखवण्यात आलं होतं. ३ ऑगस्ट २०२३ रोजी ही चूक लक्षात आली. त्यानंतर गणपती काकतकर यांनी तहसीलदारांसह अनेक स्थानिक कार्यालयांना संपर्क साधला. मात्र, कोणीही मदत केली नाही. जून २०२४ मध्ये गणपती काकतकर यांना नेमकं चुक कुठे आणि कशी घडली हे लक्षात आलं.

दरम्यान, माझ्या आजोबांच्या ऐवजी माझा आधार क्रमांक चुकीचा टाकला गेला, असं गणपती यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं. एवढंच नाही तर ही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर अखेर सोमवारी गणपती यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि वकिलासह बेळगावचे उपायुक्त मोहम्मद रोशन यांच्याकडे संपर्क साधला. यानंतर हे प्रकरण सोडवण्यासाठी उपायुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना निर्देश दिले.

Story img Loader