तीन मजली इमारत काही क्षणात कोसळली: व्हिडिओ

सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

फोटो सौजन्य-एएनआय

आंध्रप्रदेशातील गुंटूर या ठिकाणी एक तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारत अक्षरशः पत्त्यासारखी कोसळताना दिसते आहे. गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते त्याचवेळी ही इमारत अचानक कोसळली अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही असेही ‘एएनआय’ने म्हटले आहे.

 

पाहा व्हिडिओ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A three storey building collapsed during drainage repair work in guntur

ताज्या बातम्या