फिलिपाईन्सची स्थानिक भाषा समजू न शकल्याने एका भारतीय इसमाने तब्बल चारहून अधिक वर्षे फिलिपाईन्सच्या तुरुंगात काढली आहेत. मुळचे पंजाबचे असलेले बलदेव सिंग २०१८ पासून फिलिपाईन्सच्या तुरुंगात होते. अखेर, राज्यसभेचे खासदार बलबीर सिंग यांनी मध्यस्थी करून, भारतीय दूतावास शंभू एस कुमारन यांच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली असून ते आपल्या घरी परतले आहेत. व्यावसायिक दौऱ्यानिमित्त फिलिपाईन्समध्ये गेलेले बदलेव सिंग खोट्या गुन्ह्यात कसे अडकले, त्यातून ते कसे सुटले हा घटनाक्रम थरारक आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पंजाबच्या सुतलनातपूर लोधी या शहरांत गेल्या तीन दशकाहून अधिक काळ बलदेव सिंग यांचा फर्निचर बनवण्याचा व्यवसाय आहे. पंजाबमध्ये त्यांचा व्यवसाय जोमात सुरू असताना व्यवसाय-विस्तारासाठी बलदेव सिंग २०१८ मध्ये फिलिपाईन्समध्ये गेले होते. फिलिपाईन्समध्ये त्यांचे पंजाबमधील अनेक ग्राहक होते. ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांनी फिलिपाईन्समध्ये व्यवसायाच्या निमित्ताने दौरा केला. परंतु, स्थानिक भाषा समजू न शकल्याने बलदेव सिंग यांच्यावर चुकीचे गुन्हे लावले गेले.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे

फिलिपाईन्सला केला होता व्यावसायिक दौरा

या घटनेबाबत बलदेव सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “मी २०१८ च्या अखेरीस फिलिपाईन्सहून परतीच्या फ्लाइटमध्ये चढलो होतो. तेव्हा अचानक विमानात पोलीस आले. त्यांनी मला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. पोलिसांच्या सूचनेनुसार मी त्यांच्या मागून गेलो. परंतु, मला त्यांची भाषा समजत नव्हती. थोड्यावेळाने त्यांनी माझ्या हातात बेड्या ठोकल्या. या दरम्यान, मी माझ्या मुलाला फोन करून सर्व हकिगत सांगितली.”

एका प्रश्न उत्तर अन् पाच वर्षांचा तुरुंगवास

बलदेव सिंग यांना अटक करताना फिलिपाईन्सच्या पोलिसांनी स्थानिक भाषेत संवाद साधला होता. हा संवाद बलदेव सिंग यांना समजला नाही. त्यांची स्थानिक भाषा सिंग यांना कळली नाही. परंतु, पोलिसांनी बलदेव सिंग असं उच्चारताच त्यांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. बलदेव सिंग यांना वाटलं की पोलिसांनी त्यांचं नाव विचारलं आहे. परंतु, पोलिसांनी बलदेव सिंग यांना विचारलेला प्रश्न वेगळा होता.

हेही वाचा >> भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला द्वीपक्षीय करारांची चिंता; संरक्षणमंत्री म्हणतात; “जर आरोप सिद्ध झाले…!”

काय होता तो प्रश्न?

‘गुन्हा केलेल्या बलदेव सिंगपैकी तुम्ही आहात का?’ असा प्रश्न पोलिसांनी विचारला होता. परंतु, बलदेव सिंग यांना वाटलं की, ‘तुम्ही बलदेव सिंग आहात का?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे सिंग यांनी पोलिसांना ‘होय’ असं उत्तर दिलं. त्यामुळे हाच तो गुन्हेगार आहे असं समजून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. परंतु, आपण गुन्हेगार बलदेव सिंग नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तब्बल पाच वर्षे लागली.

राज्यसभेचे खासदार आणि भारतीय राजदूत आले मदतीला

याबाबत बलदेव सिंग यांची मुलगी कलमजीत कौर म्हणाली की, “फिलिपाईन्समधील मनिलामध्ये पंजाबमधील अनेक नागरिक राहतात. या पंजाबी समुदायाकडून मदत घेण्याचा प्रयत्न केला गेला. पंरतु, आचच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यामुळे आम्ही राज्यसभा सदस्य बलबीर सिंग सीतेवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांना संपूर्ण माहिती दिली. सीचेवाल फिलिपाईन्स दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी फिलिपाईन्स येथील भारतीय दूतावास शंभू एस कुमारन यांची भेट घेतली. त्यांना बलदेव सिंग यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत सांगितले. भारतीय दुतावासाने हस्तक्षेप केल्यानंतर बलदेव सिंग यांची सुटका करण्यात आली.”

सीचेवाल म्हणाले की, “२०१८ मध्ये ते फिलिपाईन्समध्ये चुकीच्या ओळखीमुळे अडकले. २०१९ पासून कोरोना संसर्ग सुरू झाल्याने लागलेल्या निर्बंधांमुळे हा खटला लांबला. दरम्यान, आपण पंजाबचे फर्निचर व्यवसायिक बलदेव सिंग असून गुन्हेगार बलदेव सिंग नाही हे सिद्ध करायला त्यांना चार वर्षांहून अधिक वर्षे लागली. या काळात त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सोसावा लागला.”

अखेर, बलदेव सिंग त्यांच्या घरी परतले असून त्यांच्या कुटुंबियांनी राज्यसभा खासदार बलबीर सिंग सीचेवाल यांचे आभार मानले.