scorecardresearch

गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवालांवर फेकली पाण्याची बाटली

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची देखील होती याप्रसंगी उपस्थिती

गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवालांवर फेकली पाण्याची बाटली
(व्हिडीओ स्क्रीनशॉट)

गुजरात निवडणुकीच्या अगोदर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काल(शनिवार) गांधीधाम आणि जुनागढमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. याशिवाय या दौऱ्यात अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गरबा कार्यक्रमासही हजेरी लावली असता, कार्यक्रमस्थळी असलेल्या गर्दीमधून कोणतरी अरविंद केजरीवाल यांच्यावर पाण्याची बाटली फेकली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार राजकोट येथील खोडलधाम गरबा कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उपस्थिती लावली होती. याचवेळी गरबा कार्यक्रमासाठी आलेल्यांपैकी कोणीतरी केजरीवालांवर पाण्याची बाटली फेकली. ही बाटली नेमकी कोणी फेकली हे समजू शकले नाही, त्याच शोध सुरू आहे.

केजरीवाल गरबास्थळी दाखल झाल्यानंतर उपस्थितांचे अभिवादन स्वीकारत असताना हा प्रकार घडला, सुदैवाने पाण्याची बाटली त्यांच्या वरूनच निघून गेल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या