पुणे : गेल्या काही दिवसांत बर्ड फ्लूचा (एच५एन१) मानवाला संसर्ग झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका चार वर्षांच्या मुलीला यंदा जून महिन्यात बर्ड फ्लूची बाधा झाली होती. बर्ड फ्लूचा मानवाला धोका वाढला असून, या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस विकसित करण्यात आली आहे. लवकरच या लशीची वैद्याकीय चाचणी सुरू होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि ‘मेडिसीन्स पेंटट पूल’ (एमपीपी) या संस्था एकत्र येऊन एमआरएनए तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रम राबवत आहेत. त्यातून अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी ‘एमआरएनए’-आधारित लशी विकसित केल्या जात आहेत. या उपक्रमांतर्गत ‘सिनरजियम बायोटेक’ या कंपनीने बर्ड फ्लूची लस मानवासाठी विकसित केली आहे. आता तिची वैद्याकीय चाचणी सुरू होणार आहे. वैद्याकीय चाचणी यशस्वी झाल्यानंतर या लशीचे तंत्रज्ञान इतर उत्पादक भागीदारांना दिले जाणार आहे. त्यातून इतर भागीदार या लशीचे उत्पादन घेऊन व्यापक पातळीवर ही लस उपलब्ध होईल.

Pune, girl died drowning pune, water tank pune,
पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
kidnap, girl, kidnap attempt thane,
ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा >>>Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पाचा हलवा कुणी खाल्ला? राहुल गांधींच्या आरोपाला अर्थमंत्री सीतारमण यांचे उत्तर; म्हणाल्या…

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेडरॉस अॅडहनोम घेब्रेयेसिस म्हणाले की, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांसाठी ‘एमआरएनए’ तंत्रज्ञानाधारित लस संशोधन, विकसन आणि उत्पादन यासाठी परस्पर सहकार्यावर भर दिला जात आहे. यामुळे आगामी काळात महासाथ येईल, त्यावेळी हे देश सक्षमपणे तिला तोंड देऊ शकतील. भविष्यातील महासाथींचा सामना करण्यासाठीची सज्जता या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे करता येईल.

भविष्यात महासाथीचे संकट

बर्ड फ्लू हा सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका बनलेला आहे. पक्षी आणि प्राण्यांमध्ये तो मोठ्या प्रमाणात पसरतो. आता संसर्ग झालेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची बाधा होत आहे. भविष्यात यामुळे महासाथ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे या महासाथीचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आतापासूनच पावले उचलली आहेत. त्यातून बर्ड फ्लूवरील लस विकसित करण्यात आली आहे.

संघटनेने ‘एमआरएनए’ तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रम विकसित केला असून, त्याचा उद्देश अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी आरोग्य क्षेत्रात सहकार्याचा आहे. या सहकार्यातून आरोग्य क्षेत्रात भागीदारी वाढून ज्ञानासह तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होईल.- डॉ. चार्ल्स गोर, कार्यकारी संचालक, ‘मेडिसीन्स पेटंट पूल’