साखरपुड्याआधी तरुणांचा धुडगूस, १०० जणांनी घरात घुसून नवरीमुलीला उचलून नेलं; मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण | A woman doctor kidnapped from house by100 goons in Telangana Ranga Reddy sgy 87 | Loksatta

VIDEO: साखरपुड्याआधी तरुणांचा धुडगूस, १०० जणांनी घरात घुसून नवरीमुलीला उचलून नेलं; मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मुलीच्या घरात घुसून कुटुंबासमोर अपहरण, तेलंगणातील धक्कादायक घटना

VIDEO: साखरपुड्याआधी तरुणांचा धुडगूस, १०० जणांनी घरात घुसून नवरीमुलीला उचलून नेलं; मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
मुलीच्या घरात घुसून कुटुंबासमोर अपहरण, तेलंगणातील धक्कादायक घटना

तेलंगणात जवळपास १०० तरुणांनी घरात घुसून २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आरोपींनी मुलीच्या घराबाहेर धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. तसंच तरुणीच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अपहरण करण्यात आलेली तरुणीचं नाव वैशाली असून, ती डॉक्टर आहे. वैशालीचा साखरपुडा ठरला होता. त्याच्या आधीच शुक्रवारी हा सर्व प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत.

वैशालीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १०० तरुण घऱात घुसले आणि घरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी मुलीचं अपहरण केलं.

वैशालीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार “मुलीवर जबरदस्ती करत तिला घऱाबाहेर ओढत नेलं आणि कारमध्ये बसवून घेऊन गेले. पोलिसांनी काहीच केलं नाही. माझ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं असून, हे पाप आहे. ते माझ्या मुलीसोबत काय करतील? हा अन्याय आहे”.

पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे. “घटनेची चौकशी करण्यासाठी आम्ही पथकं विभागली असून सर्व बाजू तपासत आहोत. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून आम्ही सर्व परीने प्रयत्न करत आहोत. आम्ही पीडित कुटुंबाकडून सर्व माहिती घेतली असून सध्या त्यानुसार तपास सुरु आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 08:48 IST
Next Story
“राज्यांचे ‘पालक’ व्हा, ‘मालक’ नव्हे!” सेनेचा केंद्रातील मोदी सरकारला सल्ला; शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, “ते धाडस…”