scorecardresearch

VIDEO: महिलेचा ‘कार’नामा, विकत घ्यायच्या आधीच ठोकली ४० लाखांची BMW

महिलेने टेस्ट ड्राइव्हदरम्यान नवी कोरी बीएमडब्ल्यू एक्स १ कार थेट शोरुममध्ये घुसवली

VIDEO: महिलेचा ‘कार’नामा, विकत घ्यायच्या आधीच ठोकली ४० लाखांची BMW

एखादी कार विकत घ्यायची म्हटलं की टेस्ट ड्राइव्ह करणं आलंच. अनेकदा टेस्ट ड्राइव्हमुळेच कार विकत घ्यायची की नाही हा निर्णय घेता येतो. मात्र चीनमधील एका महिलेला टेस्ट ड्राइव्ह घेणं आपल्याला इतकं महाग पडेल याची कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत महिला नवी कोरी बीएमडब्ल्यू एक्स १ कार टेस्ट ड्राइव्ह झाल्यानंतर थेट शोरुममध्ये घुसवून ठोकली असल्याचं दिसत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ११ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.

शोरुममधील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. यामध्ये कार थेट शोरुमचे दरवाजा तोडून आतमध्ये घुसत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला कारचा वेग कमी होता, मात्र अचानक नियंत्रण सुटून कार शोरुममध्ये घुसते आणि समोरील भिंतीवर जाऊन आदळत असल्याचं दिसत आहे. अपघातानंतर शोरुममधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

महिला चालकाने आपण ब्रेकच्या जागी चुकून एक्सलेटर दाबला असल्याची कबुली दिली आहे. अपघातात दोन कर्मचारी जखमी झाले असून कार आणि शोरुमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अपघात झालेल्या बीएमडब्ल्यू एक्स १ कारची किंमत ४० लाख रुपये आहे. महिलेने अपघाताची जबाबदारी घेतली असून सर्व नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या