VIDEO : …जेव्हा महिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मुका घेते!

मुख्यमंत्रीदेखील स्मितहास्य करताना नजरेस पडतात.

एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांचा एका महिलेने मुका घेतल्याचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. मुख्यमंत्र्यांचा मुका घेतल्यानंतर ही महिला लाजत तेथून निघून गेली. मुख्यमंत्रीदेखील स्मितहास्य करताना नजरेस पडतात. ही घटना बंगळुरमध्ये घडल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. राज्य सरकारच्या वतीने येथे कुरबा समुदायातील लोकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बंगळुरच्या पॅलेस ग्राउंडवर कुरबा समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री येथे आले होते, साधारण दुपारी साडेबाराच्या सुमारास सदर घटना घडली. आपणदेखील कुरबा समाजाचे असून, मुख्यमंत्री याच समाजातून येतात. मुख्यमंत्र्यांना इतक्या जवळून पाहिल्याने आपण उत्साहित झालो आणि त्यांचा मुका घेतल्याचे संबंधित महिलेने माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
ते माझ्या वडिलांसारखे असून, मी त्यांना अप्पाजी अशी हाक मारते. शालेय वयापासून मी त्यांच्या कार्याची चाहती आहे. मी त्यांना पहिल्यांदाच भेटल्याने खूप उत्साहित झाले, स्वत:वर ताबा ठेऊ शकले नाही आणि त्यांचा मुका घेतल्याचे ती म्हणाली. सिद्धराम्मयांच्या विधानसभा क्षेत्रात राहाणारी वरुणा नावाची ही महिला एका मंत्र्याची नातेवाईक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A woman kisses karnataka cm siddaramaiah during a state level program