Aacharya Vidhya Sagar Maharaj Passes Away :जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य विद्यासागरची महाराज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ ला कर्नाटकमध्ये झाला होता.

दिगंबर जैन आचार्य विद्यासागर दार्शनिक साधू होते. शिष्यवृत्ती आणि तपस्यांसाठी त्यांची ओळख होती. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली, पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केलं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

H D Kumaraswamy News
एचडी कुमारस्वामींचं प्रज्वल रेवण्णा यांना आवाहन; म्हणाले, “भारतात परत या आणि कुटुंबाची…”
loksatta lokrang Ideological Awakening in Maharashtra Justice Mahadev Govind Ranade
पेशवाईतील समाजाचे वस्तुनिष्ठ दर्शन
govind dev giri maharaj latest marathi news
स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती
union finance minister nirmala sitharaman interacted with students at deccan college
निर्मला सीतारामन यांना विद्यार्थिनीने विचारला प्रश्न… ‘तुम्ही कणखर कशा?’
shikrapur jategaon robbery marathi news, shikrapur robbery marathi news
पुणे: शिक्रापूर परिसरात दरोडा; ज्येष्ठ महिलेचा खून
panchgani marriage ceremony marathi news, panchgani latest marathi news
शरद पवारांसमोरच शशिकांत शिंदेंनी घेतला अजित पवारांचा आशीर्वाद, पाचगणीतील विवाह सोहळ्यात काय घडलं?
Uddhav Thackerays Criticism on Sanjay Mandalik and Dairhyasheel Mane
गद्दारांचा सूड घ्यायला कोल्हापुरात आलोय; उद्धव ठाकरे यांचे संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र
Actor Sahil Khan arrested by Mumbai police in Mahadev betting app case
साहिल खान याला अटक; महादेव ॲप आणि छत्तीसगढ यांचा नेमका संबंध काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आचार्य विद्यासागर यांच्या निर्वाणाची बातमी कळल्यानंतर आदरांजली वाहिली आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी आचार्य विद्यासागर आणि त्यांनी केलेलं कार्य हे कायम लक्षात राहिल. लोकांमध्ये श्रद्धाभाव जागृत करण्यासाठी ते ओळखले जात. डोंगरगड या ठिकाणी मी याच वर्षी त्यांची भेट घेतली होती. त्यांची भेट विसरता येणं कठीण आहे. मी त्यांना आदरांजली वाहतो. या आशयाची पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देहत्याग केला आहे. मध्यरात्री २.३५ वाजता आचार्य विद्यासागर महाराज यांची अखेरचा श्वास घेतला. चंद्रगिरीच्या डोंगरगड येथे त्यांचं निधन झालं आहे. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या तीन दिवसांपासून अन्न-जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले. आज त्यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन करण्यात येईल.