ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून मार्गक्रमण करत शुक्रवारी हिंगोलीत दाखल झाली होती. या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी दोन तरुण नेत्यांनी गळाभेट घेतली.

“आम्ही लंबी रेस के घोडे”, ‘भारत जोडो’ यात्रेत आदित्य ठाकरेंचं विधान; त्यात चुकीचं काय? यात्रेतील उपस्थितीवरुन विचारला सवाल

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

दरम्यान, भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत”, असे विधान त्यांनी काँग्रेसच्या यात्रेदरम्यान केले आहे.

“गजानन किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात…”, संजय राऊतांचं टीकास्र; स्वत:चं दिलं उदाहरण!

“लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “आम्ही सगळे लंबी रेस के घोडे आहोत. जोपर्यंत कारवा सुरू आहे तोपर्यंत आम्ही चालत राहू”, असा निर्धार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. देशात खरं बोलणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.