भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या परवानगीविनाच त्यांच्या छायाचित्राचा प्रचारात वापर करून आम आदमी पार्टीने सकृद्दर्शनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने आपचे चिटणीस पंकज गुप्ता यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली असून आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल केला आहे. सोमवापर्यंत याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2015 रोजी प्रकाशित
‘आप’कडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे सकृद्दर्शनी सिद्ध
भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या परवानगीविनाच त्यांच्या छायाचित्राचा प्रचारात वापर करून आम आदमी पार्टीने सकृद्दर्शनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
First published on: 01-02-2015 at 01:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party violated model code election commission