वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भाजपने दिल्लीत महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगणार आहे. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विविध विरोधाभासी वक्तव्ये करून अखेर या पदांसाठी भाजपने आपले उमेदवार निश्चित केले. शालिमार बागेतील भाजप नगरसेविका रेखा गुप्ता यांना महापौरपदाची उमेदवारी दिली आहे. रामनगर प्रभागातील कमल बागरी उपमहापौरपदाच्या उमेदवार असतील.

आता या महापालिकेत सर्वाधिक नगरसेवकसंख्या असलेल्या ‘आप’ने शेली ओबेरॉय यांना महापौरपद व आले मोहम्मद इक्बाल यांना उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. ओबेरॉय पूर्व पटेलनगर येथील नगरसेविका व श्रीमती इक्बाल या चांदनी महल येथील नगरसेविका आहेत.  ४ डिसेंबर रोजी झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली व येथील एकूण २५० जागांपैकी १३४ जागांवर ‘आप’ विजयी झाले. भाजपने १०४ जागांसह दुसरे स्थान मिळवले. परंतु पक्षाचे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी महापौरपद निवडणूक हा खुला सामना असल्याचे संकेत दिले होते.

Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Jalna lok sabha election २०२४, congress, Dr kalyan kale
डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीने जालन्याची लढत आता लक्षवेधक ठरणार
Farmers of Chanje boycott Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीवर चाणजे येथील शेतकऱ्यांचा बहिष्कार
Four Naxalites killed in Gadchiroli
गडचिरोलीत चार नक्षलवादी ठार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव उधळला