पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पक्षाला बहुमत मिळालं असून त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासूनच पक्षाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असून त्यांच्या शपथविधीची तयारी आता सुरु झाली आहे. येत्या १६ मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधीच्या कार्यक्रमाला भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण दिलं आहे. येत्या १६ मार्च रोजी शपथविधीचा हा सोहळा पार पडेल. याआधी आप पक्षाला भरभरून मतं दिल्यामुळे पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी तसेच विजयोत्सव साजरा करण्यासाठी भगवंत मान १३ मार्च रोजी अमृतसर येथे रोड शो करणार आहेत. या रोड शोमध्ये मान यांच्यासोबतच अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती राहणार आहे.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Arvind Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

दरम्यान,याआधी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला अंतर्गत कलहाचा फटका बसला. नवज्योतसिंग सिद्धू, चरणजितसिंग चन्नी यांच्यासारख्या बलशाली नेत्यांना परावभावाला सामोरे जावे लागले. तर आप पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केलाय. आपने एकूण ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या तब्बल ६९ जागा कमी झाल्या असून यावेळी काँग्रेसला फक्त १८ जागा मिळाल्या आहेत.