scorecardresearch

केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा

केजरीवाल यांनी अन्य राजकीय पक्षांवर खोटे आरोप केल्याची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते अर्शदीपसिंग क्लेर यांनी केली आहे.

Delhi cm arvind kejriwal campaign ek mauka kejriwal ko for assembly polls
(फोटो – ANI)

चंडीगड : आपचे नेते अरिवद केजरीवाल यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी मोहालीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. केजरीवाल यांनी अन्य राजकीय पक्षांवर खोटे आरोप केल्याची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते अर्शदीपसिंग क्लेर यांनी केली आहे. त्यासाठी आपच्या ध्वनिचित्रफितीचा दाखला दिला आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर आरोप करणारे आपचे माजी नेते कुमार विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्याने शनिवारी घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aap leader arvind kejriwal directs to file fir against him for violating election code of conduct akp

ताज्या बातम्या