‘आप’च्या पाचव्या आमदाराला दिल्ली पोलिसांकडून अटक

न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दंगल आणि गुन्हेगारी कृत्यांच्या आरोपांवरून आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अखिलेश त्रिपाठी यांनी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून अटक करण्यात आलेले त्रिपाठी हे पाचवे आमदार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन या मतदारसंघातून अखिलेश त्रिपाठी निवडून आले आहेत. दंगल आणि गुन्हेगारी कृत्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतरही न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. २०१३ मध्ये घडलेल्या दंगलीमध्ये ते आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३२३ आणि ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aap mla akhilesh tripathi arrested by delhi police