Delhi Assembly News : दिल्ली विधानसभेत आज(बुधवार) जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. गदरोळा दरम्यान आम आदमी पार्टीचे आमदार मोहिंदर गोयल यांनी सभागृहात नोटांचं बंडल दाखवलं आणि सांगितले की त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय त्यांना असा दावाही केला की याप्रकरणाची माहिती उपराज्यापालांना आहे.

मोहिंदर गोयल विधानसभेत म्हणाले, माझ्या मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे, जिथे नर्सिंग अर्दलीसाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे. ८० टक्के जुने कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा शासकीय नियम आहे. जे कंत्राट घेतात ते कर्मचारी ठेवण्याच्या नावाखाली ३०-४० हजार रुपये घेतात. ही जनेतची मोठी फसवणूक आहे. या प्रकारचे कर्मचारी औषधी, प्रिस्क्रिप्शन आणि चाचण्यांच्या नावाखाली पैसे उकळण्याचं काम करतात.

pm Narendra Modi Kanhan
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा : नागरिकांना शर्ट, टोपी, सॉक्स काढायला लावले… काय आहे कारण ?
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
If Chhagan Bhujbal will get nomination then its danger for mahavikas aghadi warn by the sakal Maratha samaj
भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास महायुतीला सर्वत्र धोका, सकल मराठा समाजाचा इशारा
opposition india alliance
बिहार ते महाराष्ट्र; लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसला करावी लागतेय तारेवरची कसरत

याशिवाय त्यांनी सांगितले की रुग्णालयात भरतीबाबतची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली आहे. अशाप्रकारचे घोटाळे झाले नाही पाहिजेत. करारानुसार कर्मचाऱ्यांना वेतनही मिळत नाही. त्यांचे पैसे घेतले जातात. तिथल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं मात्र त्यांना मारहाण केली गेली. विशेष म्हणजे एवढं होऊनही त्यांच्याविरोधात काहीच गुन्हा दाखल होत नाही. गुन्हा दाखल झालच तर जामीनही मंजूर होतो.

याचबरोबर मोहिंदर गोयल यांनी सांगितले की, “जेव्हा मी तक्रार केली तेव्हा माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला. मी पोलीस आयुक्त, मुख्य सचिव आणि उपराज्यपालांकडे तक्रार केली. त्यांनी(कंत्राटदारांनी) माझ्याशी करार करण्याचा प्रयत्न केला. डीसीपकडे तक्रारकरूनही काही कारवाई झाली नाही.”

यानंतर मोहिंदर गोयल यांनी सभागृहात नोटांचे बंडल काढत ते विधानसभा अध्यक्षांना दाखवले आणि सांगितले की, हे पैसै त्यांनी(कंत्राटदारांनी) टोकन मनी आणि लाच म्हणून मला दिले होते. याशिवाय ते म्हणाले की यासंदर्भात उपराज्यपालांना पत्र लिहिले आहे. तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत भाजपा आमदार आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांना विनंती केली की या विषयावर राजकारण केलं जाऊ नये. रुग्णालयता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.