आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे Lakme Fashion Show मध्ये आम आदमी पक्षाचे नेत आणि पंजाबमधून राज्यसभेसाठी निवड झालेले राघव चड्ढा यांनी रॅम्प वॉक केला. राघव चड्ढा यांनी डिझायनर पवन सचदेव यांनी डिझाईन केलेले कपडे घातले होते. शोस्टॉपर म्हणून राघव चड्ढा यामध्ये सहभागी झाले होते.

राघव चड्ढा यांनी प्रथमच रॅम्प वॉकमध्ये सहभाग घेताना लेदर जॅकेट घातलं होतं. राघव चड्ढा यांनी रॅम्प वॉक केल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rahul Kaswan Congress candidate attacks BJP
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल
INDIA bloc collapse in Kashmir complete NC PDP fielded candidates against each other
काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

दिल्लीचे आमदार राघव चड्ढा यांना आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राघव चड्ढा यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या सोमवारी अर्ज दाखल केला होता. ते ३३ वर्षांचे आहेत. राज्यसभेत पाऊल ठेवणारे ते दुसरे तरुण खासदार असतील. याआधी ३२ वर्षांचे अनुभव मोहंती राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. याशिवाय ३३ वर्षीय मेरी कॉमदेखील तरुण खासदार राहिली आहे. पण सध्याच्या घडीला राघव चड्ढा सर्वात तरुण खासदार असतील.

पंजाबमधील पाच राज्यसभा जागांसाठी ३१ मार्चला निवडणूक होणार आहे. पंजाबमधील मोठ्या विजयानंतर सर्व पाच जागा मिळतील अशा आशा आहेत. त्यामुळे राघव चड्ढा यांच्यासहित सर्व पाच उमेदवार राज्यसभेत जाणार हे नक्की मानलं जात आहेत. ११७ जागांच्या पंजाबमध्ये आपने ९२ जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे.