आम आदममी पक्षाने त्यांच्या पक्षाला २०२५-२६ या वर्षात १२ कोटी ९ लाख रूपये देणगी मिळाल्याचं जाहीर केलं आहे. तसंच हे देखील सांगितलं आहे की या वर्षी त्यांच्या पक्षाला मिळालेली देणगी ६८ टक्क्यांनी घटली आहे. तर बिजू जनता दलाने सांगितलं आहे की आम्हाला २०२५-२६ या वर्षात एक रूपयाही देणगी म्हणून मिळालेला नाही. ओडिशा मध्ये सत्ता आल्यानंतरचं हे पहिलं वर्ष आहे ज्या वर्षी बिजू जनता दलाला एक रूपयाही देणगी म्हणून मिळालेला नाही.

आम आदमी पार्टीने देणगीबाबत काय सांगितलं?

आम आदमी पार्टीने हे जाहीर केलं आहे की २०२५-२६ या वर्षात दोन देणगीदार होते Prudent Electoral Trust and Trident Limited या दोन प्रत्येकी पाच कोटी रूपयांची देणगी पक्षाला दिली. हीच आमच्यासाठी मोठी देणगी ठरली असं त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच आम आदमी पक्षाला जैन सिदिक्की आणि असोसिएट्स यांच्याकडून ५ लाख रूपये देणी मिळाली. तर ब्रिलियंट स्टडी सेंटरकडून आम आदमी पक्षाला २० हजार १० रूपये देणगी देण्यात आली. तर आशुतोष रांका जे आता कॉक्रोच जनता पार्टीचे सह संस्थापक आहेत त्यांनी आम्हाला २१ हजार १०० रुपये देणगी दिली असंही आम आदमी पार्टीने स्पष्ट केलं आहे. २०२४-२५ या वर्षात आम आदमी पक्षाला ३८ कोटी १० लाख रूपये देणगी म्हणून मिळाले होते. त्या तुलनेत या वर्षीच्या देणगीमध्ये ६८ टक्के घट झाली आहे असं आपने म्हटलं आहे.

बिजू जनता दलाने काय म्हटलं आहे?

बिजू जनता दलाने २०२५-२६ या वर्षात मिळालेल्या देणगीबाबत ही माहिती दिली आहे की त्यांच्या पक्षाला या वर्षात एक रूपयाही देणगी मिळालेली नाही. मागील २४ वर्षांत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. २०२४ मध्ये बिजू जनता दलाला ६० कोटी रुपये देणगी मिळाली होती. त्यातील २५ कोटींची देणगी ही वेदांता लिमिटेड या कंपनीने दिली होती असंही बिजू जनता दलाने स्पष्ट केलं आहे.

इतर पक्षांना वर्षभरात किती देणगी मिळाली?

आसोम गण परिषद या एनडीएतील घटक पक्षाला ७ कोटी ६४ लाख रूपये देणगी मिळाली आहे. तर तेलगु देसम पार्टी या पक्षाला ५८ कोटी २५ लाख रूपये देणगी मिळाली आहे. चिराग पासवान यांच्या लोजपा अर्थात लोकजनशक्ती पार्टी या पक्षाला ३ कोटी २३ लाख रूपये देणगी २०२५-२६ या वर्षात मिळाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.