भाजपासाठी खऱ्या अर्थानं फटाकेमुक्त दिवाळी; पोटनिवडणुकीच्या निकालानंतर अभिषेक बॅनर्जींचा टोला

पश्चिम बंगालमध्ये चार मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

abhishek

देशभरातील तीन लोकसभा तसेच २९ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरू आहे. १३ राज्यांमध्ये या पोटनिवडणुकांसाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले होते. पश्चिम बंगालमध्ये चार मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिनहाटा, सांतीपूर, खारदाह आणि गोसाबा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसने जिंकले आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

तृणमूलने पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत भाजपाला टोला लगावला. “भाजपासाठी खऱ्या अर्थानं फटाकेमुक्त दिवाळी. भाजपाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा,” असं अभिषेक बॅनर्जींनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दिनहाटा, सांतीपूर, खारदाह आणि गोसाबा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमदेवार विजयी झाले आहेत. 

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर पोटनिवडणुकीत टीएमसीच्या उमेदवारांच्या कामगिरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhishek banerjee tweet on west bengal bypoll results says firecrackers free diwali for bjp hrc

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य