अबू धाबी : भारतातील बहुसंख्य प्रमुख शहरांपासून तीन ते चार तासांचा विमान प्रवास करून अबूधाबीला पोहोचता येते. हे शहर संयुक्त कुटुंबांना खास दिवाळी साजरी करण्यासाठी आमंत्रित करत आहे. आजी-आजोबांपासून ते लहान मुलांपर्यंत, प्रत्येक पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या, या हंगामी पॅकेजमध्ये शुभ्र वाळूचे किनारे, जागतिक दर्जाची म्युझियम, थीम पार्क्स, सणासुदीची खरेदी आणि कौटुंबिक मेजवान्या यांचा संगम आहे. या हॉलिडे पॅकेजेसची सुरुवात माणशी ८३,८२५ रुपयांपासून होते.
१. दिवाळीसाठी पर्यटन वाटते त्यापेक्षा सोपे आहे.
भारतापासून विमानाने जवळ असलेले अबूधाबी, लहान सहलींसाठी आणि कुटुंबासोबत मोठ्या सुट्ट्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सहा रात्रींच्या मुक्कामात, कुटुंबांना अविस्मरणीय अनुभव देणारी एक आरामदायी सहलीचा आनंद मिळू शकतो. युटाझोचे (Utazzo) सहा रात्रींचे ‘डिस्कव्हर अबू धाबी फेस्टिव्ह सेलिब्रेशन्स’ पॅकेज माणशी ८३,३२५ रुपयांपासून सुरू होते. यामध्ये नाश्ता, राहणे आणि विमानतळ हस्तांतरणाचा समावेश आहे. तसेच शेख झायेद ग्रँड मशीद, लूव्र अबू धाबी, यास आयलंड थीम पार्क आणि वाळवंटाच्या सफारी करता येतील. यानंतरही खरेदीसाठी वेळ शिल्लक राहतो. अहमदाबादहून जाणाऱ्या आणि प्रवासाची व्यवस्था स्वतः करणाऱ्या कुटुंबांसाठी, फ्लेमिंगो ट्रान्सवर्ल्डचे (Flamingo Transworld) ‘दिवाळी पॅकेज – एपिक टूर पॅकेज विथ स्काय व्ह्यू’ आहे. हे पॅकेज माणशी १,६७,५०० रुपयांपासून सुरू होते आणि त्यात येण्या-जाण्याची इकॉनॉमी विमानसेवा, यूएई व्हिसा आणि अबू धाबीमधील तीन रात्रींच्या मुक्कामाचा समावेश आहे. एमिरेट्स पॅलेस मँडरिन ओरिएंटलमध्ये हाय टी, यास आयलंडवरील दोन थीम पार्क्सना भेटी, टीमलॅब फिनोमेना अबू धाबी आणि शेख झायेद ग्रँड मशीद यांचा समावेश आहे.
२. संपूर्ण परिवाराला त्यांच्या आवडीची सुट्टी मिळते
छोटी सुट्टी, पण कुटुंबाची इच्छा-यादी मोठी? अबूधाबीमध्ये कुटुंबांना संस्कृती आणि थीम पार्क्स यांपैकी एकच, अशी निवड करण्याची गरज पडत नाही. सादियात बेटावरील म्युझियममध्ये सकाळ घालवल्यानंतर दुपारी यास बेटावर रोलरकोस्टर व मनोरंजनाचा आनंद घेता येतो. थॉमस कुकचे तीन रात्रींचे ‘अरेबियन धमाका – विंटर’ पॅकेज प्रति व्यक्ती १,३६,५०० रुपयांपासून सुरू होते. यामध्ये टीमलॅब फेनोमेना अबूधाबी येथील कला-अनुभव, कासर अल वतनची वास्तुकला, स्नो अबूधाबी येथे वाळवंटातील बर्फवृष्टी आणि यास बेटावरील दोन थीम पार्क्समध्ये प्रवेश यांचा समावेश आहे. याबरोबरच, शहाराचा फेरफटका, शेख झायेद ग्रँड मशिदीत फोटोसाठी थांबा आणि ‘बीएपीएस’ हिंदू मंदिराला भेट यांनी या मुक्कामाची सांगता होते.
३. दिवाळीत समुद्रकिनाऱ्यावर एक दिवस
पर्यटन आणि कौटुंबिक साहसांच्या दरम्यान, निवांत क्षणही मिळू शकतात. रिक्सोस प्रीमियम सादियात आयलंड १ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान किमान दोन रात्रींच्या मुक्कामासाठी सर्वोत्तम उपलब्ध दरावर २५% पर्यंत सूट देत आहे, तसेच निवडक रूम प्रकारांमध्ये मुलांसाठी मोफत सर्वसमावेशक निवासाची सोय आहे. याचा अर्थ असा की, अबूधाबीच्या समुद्राजवळ एकत्र वेळ घालवून दिवाळीच्या कौटुंबिक सुट्टीत आणखी काहीतरी वेगळे करता येते.
४. दिवाळीची मेजवानी
घरापासून दूर असले तरी खास आपले पदार्थ चाखता येतील. ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान, ‘नमक’च्या दिवाळी टेबलमध्ये लाईव्ह चाट, तंदूरमधील आवडते पदार्थ, प्रादेशिक भारतीय पदार्थ आणि पारंपरिक मिठाई यांचा समावेश असेल. याची किंमत अंदाजे ४,२०० रुपये प्रति प्रौढ व्यक्ती असेल, आणि १० वर्षे वयापर्यंतच्या दोन मुलांसाठी जेवण मोफत असेल.
५. आनंद वाढवणारी सणासुदीची खरेदी
ज्या कुटुंबांना धनत्रोयदशी आणि दिवाळीची खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ‘द गॅलेरिया अल मरिया आयलंड’ मॉलमध्ये आलिशान फॅशन हाऊस आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स एकत्र दिसतात. यामुळे सणासुदीची खरेदी हा एक अनोखा अनुभव ठरतो.
visitabudhabi.ae/en/campaign/diwali वर ही सहल बूक करता येईल. (ही माहिती अबूधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे.)
