भ्रष्टाचार विरोधी पथकाने (Anti Corruption Bureau) एका अधिकाऱ्याच्या घरी टाकलेल्या धाडीत बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. तपासादरम्यान जेव्हा अधिकाऱ्याकडे सात किलो सोनं सापडलं तेव्हा एसीबी अधिकारीदेखील चक्रावले. एसीबीला कृषी विभागाचे सह-संचालक रुद्रेशप्पा टी एस (Rudreshappa T S) यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर छापा टाकत कारवाई करण्यात आली.

सात किलो सोनं जप्त

छापेमारीदरम्यान अधिकाऱ्याच्या एकूण सात ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यावेळी सात किलो सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची किंमत जवळपास साडे तीन कोटी आहे. याशिवाय १५ लाखांची रोख रक्कमदेखील सापडली आहे. बुधवारी सकाळी ही छापेमारी करण्यात आली असून यानंतर हा खुलासा झाला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

एसीबीकडून सध्या अनेक संस्था आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे. ही कारवाई कर्नाटकमधील सर्व जिल्ह्यांमध्ये केली जात आहे.