तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल, आरोपीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
#AttentionPlease : The accused of “Child Sexual Molestation and murder @ Singareni Colony, found dead on the railway track, in the limits of #StationGhanpurPoliceStation.
Declared after the verification of identification marks on deceased body. pic.twitter.com/qCPLG9dCCE
— DGP TELANGANA POLICE (@TelanganaDGP) September 16, 2021
काय आहे प्रकरण?
ही घटना हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने मुलीशी मैत्री केली होती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल नऊ विशेष टीम फरार आरो्पीचा शोध घेत होत्या. आरोपीची ओळख पटवणं सोपं व्हावं, यासाठी हैदराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली होती.
सहा वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, आरोपींचं एन्काऊंटर करणार; मंत्र्याची भरसभेत ग्वाही
आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस..
तसेच बुधवारी जारी केलेल्या निवेदनात हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं जाहीर केलं होतं.