कांगारूंच्या कळपात बंडाळी!

* चार खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई * उपकर्णधार वॉटसन निवृत्तीच्या विचारात सलग दोन कसोटी सामन्यांतील पराभवांमुळे खचलेल्या ऑस्ट्रेलियाची सोमवारी ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच स्थिती झाली. प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी शिस्तभंगाची कारवाई करून अष्टपैलू शेन वॉटसन, फलंदाज उस्मान ख्वाजा, वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन आणि मिचेल जॉन्सन या चौघांची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हकालपट्टी केली.

*  चार खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई
*  उपकर्णधार वॉटसन निवृत्तीच्या विचारात
सलग दोन कसोटी सामन्यांतील पराभवांमुळे खचलेल्या ऑस्ट्रेलियाची सोमवारी ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच स्थिती झाली. प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी शिस्तभंगाची कारवाई करून अष्टपैलू शेन वॉटसन, फलंदाज उस्मान ख्वाजा, वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन आणि मिचेल जॉन्सन या चौघांची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हकालपट्टी केली. या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या संघात बंडाळी झाली असून, उपकर्णधार शेन वॉटसनने दौरा अर्धवट सोडून  मायदेशी प्रयाण केले आहे. तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याच्या विचारात असल्याचे समजते.
हैदराबादच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाने एक डाव आणि १३५ धावांनी मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी कशी उंचावेल, याचे सादरीकरण करायला सांगितले होते. परंतु हे चार खेळाडू सादरीकरण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सादरीकरण न केल्याबद्दल या चौघांना संघातून वगळण्याची कारवाई करण्यात आली आहे. वॉटसनची पत्नी गर्भवती असून, त्याला घरी परतण्याची मुभा आधीच देण्यात आली असल्याचे पांघरूण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जरी घातले असले तरी आता हे प्रकरण आणखी कोणती वळणे घेते, याची क्रिकेटजगतात उत्सुकता निर्माण झाली आहे. वॉटसन बंड करून बिनदिक्कतपणे मायदेशी निघाला आहे. आता पॅटिन्सन, जॉन्सन आणि ख्वाजा कोणता निर्णय घेणार हे औत्सुक्याचे आहे. पण हे प्रकरण ऑस्ट्रेलियन संघात चांगलेच धुमसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action on australian cricket players

ताज्या बातम्या