दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी २० जुलैच्या दिवशी म्हणजेच सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन उभं केलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत या विद्यार्थ्यांचा संसदेवर मार्च निघाला होता. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला तसंच अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. ज्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा वाढतो आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी कविता पोस्ट करत सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
काय आहे अतुल कुलकर्णींनी पोस्ट केलेली कविता?
बीस जुलाई की अगली सुबह…
रे पुलिस सिपाही लाठी वाले
क्या घर जा कर तू रोया कल ?
रे सांसद, मेरी संसंद वाले
क्या घर जा कर सो पाया कल?
मैं कल रोया ख़ून के आसूँ
ना मैं सोया, किस को कोसूँ
बच्ची मेरी नींद में चीखी
सपने में उसने लाठी देखी
रे सिपाही लाठी वाले
पुलिस सिपाही लाठी वाले
क्या घर जा कर तू रोया कल?
रे सांसद, मेरी संसंद वाले
क्या घर जा कर सो पाया कल ?
आखों में आसूँ सबके लिए
मुझे चाहिए वो सरकार
हाथ कपकपाते सबके लिए
मुझे चाहिए वो सरकार
मैं तो सीमा के अंदर हूँ
झप्पी क्यों हो सीमापार
सबके लिए आखों में आसूँ
मुझे चाहिए वो सरकार
रे सांसद, मेरी संसंद वाले
क्या घर जा कर सो पाया कल?
ट्रोलीयाँ मुझको देने वाले
सहचर हो तुम, साथी भी
भारत माँ की कोख से जन्में
मैं भी, तू भी, ये भी, वो भी
लेकिन हाँ,
रे सांसद, मेरी संसंद वाले
क्या घर जा कर सो पाया कल?
रे पुलिस सिपाही लाठी वाले
क्या घर जा कर तू , रोया कल ?
अतुल कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना
अशी कविता अतुल कुलकर्णी यांनी पोस्ट केली आहे. या कवितेतून त्यांनी व्यवस्थेलाच प्रश्न विचारले आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली. कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन उभं केलं. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला. २८ जून पासून त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन उपोषण सुरु केलं. यानंतर त्यांच्या उपोषणाच्या २१ व्या दिवशी म्हणजेच १८ जुलैच्या दिवशी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांनी अजूनही उपोषण सोडलेलं नाही. दरम्यान विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध अनेक राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी नोंदवला आहे. अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुकवर ही कविता पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
