Actors Puja Banerjee Kunal Verma : मनोरंजन जगतातील एक प्रसिद्ध जोडपे पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा हे सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळातून जात आहेत. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत, या दोघांनी त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती दिली आहे. या दोन अभिनेत्यांची त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने आर्थिक फसवणूक केल्यानंतर त्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गमावल्याबद्दल खुलासा केला आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा शून्यातून सुरूवात करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पूजाने त्याच्यांबरोबर झालेल्या आर्थिक फसवणुकीबद्दल ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. तसेच अभिनेत्रीने यातून बाहेर पडण्यासाठी आपण कठोर मेहनत घेणार असल्याचेही म्हटले आहे.
पूजाने सांगितले की, “गेलेले २-३ महिने हे आमच्यासाठी खूपच कठीण गेले, आणि पुढे काय होईल याबद्दल आम्हाला कसलीच कल्पना नाही. आम्ही एका आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले आणि आम्ही मोठी रक्कम गमावली. आम्हाला शून्यापासून सुरूवात करावी लागेल आणि आम्ही हिम्मत सोडणार नाही. आम्हाला हार पत्करायची नाही. या फसवणुकीत आम्ही आमची सर्व बचत गमावली… हमे वापीस झिरो पे लाके खडा कर दिया हैं (आम्हाला पुन्हा शून्यावर आणून ठेवले आहे)”.
पूजा बॅनर्जी म्हणाली की ते पुन्हा कठोर परिश्रम करण्यास आणि पुढे जाण्यासाठी तयार आहेत. पूजाने हेही कबूल केले की तिचा नवरा, कुणाल हा या घटनेमुळे खूप प्रभावित झाला आहे. तिने सांगितले की, त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी आणि या घटनेबद्दल बोलण्याकरिता खूप वेळ लागला.
या जोडप्याने त्यांची फसवणाऱ्या व्यक्तीबद्दल खुलासा केला नाही, मात्र हा व्यक्ती त्यांच्या खूप जवळचा होता असे सांगितले. “जेव्हा तुम्ही गेल्या ३ वर्षांपासून एखाद्यावर विश्वास ठेवत असाल… जो तुमच्याबरोबर असतो, तुमचे घर आणि कुटुंबाचा भाग बनतो…” असे कुणाल म्हणाला. यादरम्यान पूजा पुढे म्हणाली की, “आम्हाला खूप वाईट वाटले, पण आम्ही या टप्प्यावर हार मानू इच्छित नाही आणि अधिक मजबूतीने बाहेर पडू इच्छितो.”
कुणालने सांगितले की त्यांनी या घटनेनंतर खूप अश्रू गाळले, तसेच त्याने गेले काही महिने कुटुंबासाठी अत्यंत दु:खद होते. पण सध्या ते नव्याने सुरूवात करत असताना त्यांना त्यांच्या चाहत्यांचा पाठिंबा हवा आहे. फसवणूक करणाऱ्याकडून गमावलेले सर्व पैसे परत मिळवण्याची लढाई खूप दीर्घकाळ चालणारी असल्याचेही नमूद केले.
कोण आहेत पूजा आणि कुणाल?
पूजाने ईदच्या दिवशी एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिचा एक मित्र त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे या सणाच्या दिवशी बिर्याणीऐवजी दाळ-भात खाताना दिसत होता.
पूजाने कहाणी घर घर की, करम अपना अपना, कस्तुरी, ये रिश्ता क्या केहलाता है, सर्वगुण संपन्न, देवों के देव – महादेव, कबुल है आणि इतर अनेक मालिकांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. तर कुणाल यानेदिल से दिल तक, हवन, देवों के देव – महादेव, झनक. डिअर इश्क, आणि एक मुठ्ठी आसमान अशा मालिकांमध्ये काम केले आहे.