scorecardresearch

अभिनेत्री चारु रोहतगी यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन

रिपोर्ट्सनुसार त्यांच्या निधनाचे कारण कामाचा ताण सांगितले जात आहे

प्रसिद्ध अभिनेत्री चारु रोहतगी यांचे १५ जानेवारीला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. चारु यांनी नो वन किल्ड जेसिका आणि इश्कजादे या सिनेमात काम केले होते. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने ट्विटरद्वारे त्यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले.

चारु यांनी इश्कजादे सिनेमात परिणीतीच्या आईची भूमिका साकारली होती. ट्विटरवर दुःख व्यक्त करताना परिणीती म्हणाली की, ‘चारु रोहतगी मॅडम तुमच्या आत्म्याला शांती लाभो. इश्कजादेमध्ये तुम्ही सर्वात सुंदर आई झाल्यात. तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच सुंदर होता. एवढ्या मोठ्या दुःखातून सावरण्याची देव तुमच्या कुटुंबाला शक्ती देवो.’ स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी चारु यांना हृदयविकाराचा झटका आला. रिपोर्ट्सनुसार त्यांच्या निधनाचे कारण कामाचा ताण सांगितले जात आहे. कारण त्या दिवशी सकाळी ३ वाजेपर्यंत त्या चित्रीकरणात व्यग्र होत्या.

चारु यांनी छोट्या पडद्यावरही काम केले आहे. त्यांनी बरुण सोबतीच्या ‘इस प्यार को क्या नाम दूं’ मालिकेत काम करत होत्या. लेडीज स्पेशल ही त्यांची पहिली टीव्ही मालिका होती. यानंतर त्यांनी एक थी नायिका, त्रिदेवियां, प्रतिज्ञा, उतरन या मालिकांमध्येही काम केले. मालिकांशिवाय त्यांनी ‘१५ पार्क एवेन्यू’, ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’, ‘१९२० लंडन’ या सिनेमांतही काम केले आहे. समिक्षकांनीही त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress charu rohatgi died makes parineeti chopra sad film ishqzaade

ताज्या बातम्या