कार्यक्रम सादर करताना सर्पदंश झाल्याने अभिनेत्रीचा मृत्यू

स्टेजवर कार्यक्रम सादर करत असताना सर्पदंश झाल्याने एका ६३ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील बारुनहात गावात जत्रेत कार्यक्रम सादर करत असताना ही दुर्देवी घटना घडली.

(संग्रहित छायाचित्र)

स्टेजवर कार्यक्रम सादर करत असताना सर्पदंश झाल्याने एका ६३ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील बारुनहात गावात जत्रेत कार्यक्रम सादर करत असताना ही दुर्देवी घटना घडली. कालिदासी मोनडाल असे मृत अभिनेत्रीचे नाव आहे. कालिदासी देवी नेहमी प्लास्टिकच्या सापासह कार्यक्रम सादर करायची. पण यावेळी जिवंत सापासह कार्यक्रम सादर करताना सर्पदंशाची दुर्देवी घटना घडली.

कालिदासीला सर्पदंशानंतर लगेच रुग्णालयात नेले असते तर तिचे प्राण वाचू शकले असते असे डॉक्टरांनी सांगितले. कालिदासी स्टेजवर कोसळल्यानंतर तिथे असणाऱ्यांनी तिच्यावर ‘ओझा’ पद्धतीचे उपचार केले. यामध्ये मंत्रोच्चाराचे पठण करुन आणि वनऔषधीचे लेप लावला जातो.

या उपचाराचा काहीही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले पण तो पर्यंत उशीर झाला होता. कोणीही यासंबंधी तक्रार नोंदवलेली नाही पण पोलीस आपल्याबाजूने तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actress died by snake bite

ताज्या बातम्या