नवी दिल्ली : बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत प्रस्थापित असलेल्या अदानी समूहाचा आता सिमेंट उद्योगाचा मार्ग सुकर होणार आह़े

‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी १०.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा करार पूर्ण केल्याचे अदानी समूहाने रविवारी जाहीर केल़े

  अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम यांच्या संचालनाच्या मुख्य उद्योगांपलीकडे जाऊन विमानतळे, डेटा सेंटर्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली आहे.

या समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड अशा दोन सिमेंट उपकंपन्या स्थापन केल्या होत्या. यापैकी अदानी सिमेंटेशन ही कंपनी महाराष्ट्रातील रायगड आणि गुजरातमधील दहेज येथे दोन सिमेंट कारखाने उभारण्याची योजना आखत होती. आता होल्सिम लिमिटेडशी झालेल्या करारामुळे अदानी समूहाला अंबुजा सिमेंट्समधील ६३़ १ टक्के हिस्सा मिळणार आह़े  होल्सिम लिमिटेडचा अंबुजा सिमेंटमध्ये ६३़१ आणि एसीसीमध्ये ५४़५३ टक्के हिस्सा आह़े  आता हा हिस्सा अदानी समूहाला मिळणार आह़े