scorecardresearch

पॉर्नस्टारने सुरू केलं जगातलं पहिलं ‘पॉर्न विद्यापीठ’; अभ्यासक्रमात लाईव्ह कार्यशाळा, प्रॅक्टिकल्स आणि बरंच काही…

याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रही भरवण्यात येणार आहेत, ज्यात लाईव्ह सेक्स सीनचं प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे

पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायात यश कसं मिळवायचं याच्या प्रयत्नात असणाऱ्या कलाकारांसाठी कोलंबियातल्या एका पॉर्नस्टारने चक्क पॉर्नचं विद्यापीठ सुरू केलं आहे. अलेक्झांड्रा ओमाना रुईझ, असं या पॉर्नस्टारचं मूळ नाव असून ती अमरान्ता हँक या नावाने पॉर्न इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तिने मेडेलिनमध्ये आपलं विद्यापीठ सुरू केलं असून तिथं ती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रही भरवणार आहे, ज्यात लाईव्ह सेक्स सीनचं प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे.

आता अमरान्ता स्वतः या प्रात्यक्षिकांमध्ये काम करणार आहे की नाही, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. डेलिमेल या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, द सीक्रेट गार्डन एरॉटिक पब याठिकाणी वर्ग भरणार आहेत. याच ठिकाणी पॉर्नस्टार बनण्याची इच्छा असणाऱ्या अभिनेते-अभिनेत्रींना बोगस निर्माते कसे ओळखायचे, योग्य आणि उत्तम पॉर्न सीन कसा द्यायचा याचं प्रशिक्षण दिलं जातं.

अमन्तारा नऊ तासांची कार्यशाळा घेते. या कार्यशाळेसाठी तिच्यासोबत एक पुरुष पॉर्नस्टार रॅमन नोमरही आहे. हे दोघे विद्यार्थांना शिकवतात की पॉर्नस्टार म्हणून आपली प्रतिमा कशी जपायची? तुम्हाला कोणत्या पद्धतीचा पॉर्नस्टार बनायचं आहे? या कार्यशाळेत लिंग ताठरतेच्या नैसर्गिक, रासायनिक आणि यांत्रिक पद्धती यांचाही समावेश आहे. अमन्तारा म्हणाली, मला लोक म्हणत होते की ते त्यांच्या नोकरीला कंटाळले आहेत, त्यांना रोज ऑफिसला जायचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मला पॉर्नस्टार बनायचं आहे, पॉर्नची निर्मिती करायची आहे. अशा लोकांसाठी मी हे विद्यापीठ सुरू केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adult film star opens up a porn university in colombia vsk

ताज्या बातम्या