नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यावरून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आता पक्षातून टीका होऊ लागलीये. आतापर्यंत केवळ अंतर्गत स्वरुपात असलेली खदखद नेते आता उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून अडवाणींवर टीका केली.
मोदींवर राहुल कडाडले !
लोकभावना काय आहे, हे समजून घेण्यात अडवाणी अपयशी ठरलेत. त्यांनी स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. आता ते मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करू शकतात, असे ट्विट सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटवरवर केले.
अडवाणी अडलेलेच?
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यावरून अडवाणी यांची नाराजी दूर करण्यात पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह अपयशी ठरले. मंगळवारी त्यांनी अडवाणी यांची भेट घेतली. मात्र, यावेळी अडवाणींनी राजनाथ सिंह यांना कोणतेही आश्वासन देण्यास नकार दिला. एकीकडे भाजपमधील नरेंद्र मोदी समर्थक गट त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून लवकरात लवकर करावे, यासाठी आक्रमक आहेत. तर दुसरीकडे अडवाणी आणि त्यांचे समर्थक मोदी यांची उमेदवारी इतक्या लवकर जाहीर करू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत.
दंगल आवडे सर्वाना..
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
लोकभावना ओळखण्यात अडवाणी अपयशी – सुशीलकुमार मोदींची टीका
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यावरून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आता पक्षातून टीका होऊ लागलीये.

First published on: 12-09-2013 at 10:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advani adamant sushil modi says he should gauge public mood on namo