पीटीआय, लखनौ

पुरुषांनी शिंप्यांच्या दुकानात महिलांचे मोजमाप घेऊ नये, त्यांनी स्त्रीचे केस कापू नयेत किंवा तिला व्यायामशाळेत प्रशिक्षण देऊ नये, असे प्रस्ताव उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने विचारार्थ मांडले आहेत. महिलांचे संरक्षण करणे आणि ‘सहेतुक स्पर्श’ व पुरुषांचा वाईट हेतू रोखण्यासाठी आयोगाने यासंदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत. यासंदर्भात गेल्या महिन्यात २८ ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर जिम, कापड दुकाने व कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविणे व शाळेच्या बसेसमध्ये सुरक्षेसाठी महिलेची नियुक्ती करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला. आयोगाने मार्गदर्शक सूचनांसंदर्भात सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्रे पाठविली आहेत.

stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

शिंपी पुरुष असेल तर आक्षेप नाही परंतु माप महिलेनेच घ्यायला हवे. महिलांची जिम व योग केंद्रात प्रशिक्षकपदी महिलाच असावी. अशा संस्थांमध्ये सीसीटीव्ही व डीव्हीआर सुरूच ठेवावे. महिलांचे कपडे विकणाऱ्या दुकानात महिलाच असावी.- बबिता चौहान, अध्यक्षा, उत्तर प्रदेश महिला आयोग

हेही वाचा >>>तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य

प्रस्ताव

● कापडाच्या दुकानात महिला कर्मचारी असाव्या.

● जिम, योग केंद्रात महिला प्रशिक्षक.

● शाळा बसेसमध्ये महिलेची नियुक्ती

● समाजवादी पक्षाच्या आमदार रागिणी सोनकर म्हणाल्या की कोणत्या शिंप्याकडे कपडे शिवायचे किंवा कोणत्या जिममध्ये जायचे याचा निर्णय व्यक्तींवर सोपवावा.

● यापेक्षा मूर्ख कल्पना असू शकत नाही अशी टीका लखनऊ विद्यापीठाच्या माजी हंगामी कुलगुरू रूपरेखा वर्मा यांनी केलीे. मुले आणि मुली यांच्यामध्ये अशा प्रकारचा भेद करण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या.

● ही विचार प्रक्रिया योग्य नाही असे मत ‘ऑल इंडिया डेमोक्रॅटिक विमेन्स असोसिएशन’च्या राष्ट्रीय सहसचिव मधू गर्ग यांनी व्यक्त केले.

Story img Loader