अफगाणिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात ५० ठार

व्हॉलीबॉलचा सामना बघण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत घुसून आत्मघातकी हल्लेखोराने रविवारी घडवून आणलेल्या स्फोटात ५० जण ठार तर अन्य ६० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

व्हॉलीबॉलचा सामना बघण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत घुसून आत्मघातकी हल्लेखोराने रविवारी घडवून आणलेल्या स्फोटात ५० जण ठार तर अन्य ६० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील पक्तिता जिल्ह्य़ाच्या याह्य़ा खलील भागात व्हॉलीबॉलचा सामना सुरू असतानाच मैदानाच्या मध्यावर मोटारसायकलवरून आलेल्या या आत्मघातकी हल्लेखोराने आपल्याकडील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. त्यावेळी प्रांतिक अधिकाऱ्यांसह अनेकजण तेथे उपस्थित होते. या स्फोटात ५० जण ठार व ६० जण जखमी झाल्याचे पक्तिता प्रांताचे उपराज्यपाल अताउल्ला फाझली यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या सीमेवरील पक्तिता हा प्रांत अत्यंत स्फोटक असाच ओळखला जातो. पक्तिता प्रांतात जुलै महिन्यातही आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आला होता. एका ट्कमधून आलेल्या आत्मघातकी हल्लेखोराने उरगून जिल्ह्य़ातील गजबजलेल्या बाजारपेठेत केलेल्या हल्ल्यात ४१ जण ठार झाले होते.
दरम्यान, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी या आत्मघातकी हल्ल्याचा निषेध केल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. तालिबानी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी मात्र स्वीकारलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Afghan suicide blast kills

ताज्या बातम्या